
फलटण शहरातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असलेला निरा उजवा कालवा दिनांक 12 जून 2026 रोजी पासून बंद करण्यात आला आहे . हा कालवा साधारण 45 दिवस बंद राहणार आहे. सद्यस्थितीत फलटण नगर परिषदेच्या साठवण तलावामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संपूर्ण शहर पुढील 45 दिवस पुरेल इतका पुरेसा नाही. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन फलटण नगर परिषदेने पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतला असून शहरात गुरुवार दिनांक 18 जून 2026 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने पाणीपुरवठाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग, पेठ महतपुरा आणि जिंती नाका संपूर्ण भाग या परिसरामध्ये दिनांक 18, 20, 22, 24, 26, 28, आणि 30 जून 2026 रोजी पाणीपुरवठा केला जाईल,तर फलटण शहरातील उर्वरित संपूर्ण भागामध्ये दिनांक 19, 21, 23, 25, 27, आणि 29 जून 2026 रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे. कालवा बंद असल्याने निर्माण झालेली ही टंचाई नैसर्गिक परिस्थितीमुळे असल्याने नागरिकांनी आपल्या भागाला पाणी येण्याच्या दिवशी ते अत्यंत काटकसरीने व जपून वापरावे, जेणेकरून पुढील दीड महिन्यात सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य होईल असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे .
Leave a Reply