Site icon फलटण Times

विधानपरिषदेवर फलटण तालुक्यामधुन कोणाची वर्णी लागणार.. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आशावादी

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच फलटण तालुक्यातून भाजपा तर्फे मा. खासदार श्री. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व शिवसेनेतर्फे मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संजीव राजे नाईक निंबाळकर यांची नवे चर्चेत आहेत.  मा. खासदारांनी लोकसभेच्या पराभवानंतर फलटण विधानसभा, फलटण नगराध्यक्ष व फलटण पंचायत समिती सभापतीपदी विजय संपादन करून तालुक्यावर आपली पकड मजबूत केली. तसेच मा. जिल्हा परिषद अध्यक्षांनी नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यश संपादन केले.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी आशादायी आहेत. विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यास प्रथमच इतिहासात फलटणला ३ आमदार लाभतील.

Exit mobile version